Breaking
आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाण्यात बनावट मद्याच्या बाटलीचे झाकण बनविणाऱ्या कारखान्यात राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई,पाच मोठ्या मशीन सह एकूण 40 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*ठाण्यात बनावट मद्याच्या बाटलीचे झाकण बनविणाऱ्या कारखान्यात राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई…..*

*पाच मोठ्या मशीन सह एकूण 40 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त*

ठाणे
ठाणे शहरातील गजबजलेल्या वागळे इस्टेट परिसरात अवैध मद्य निर्मिती करण्याकरिता लागणाऱ्या बाटलीच्या बनावट झाकाणांचे उत्पादन केले जात असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून या कारखान्यावर छापेमारी केली. छापेमारी दरम्यान राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विविध कंपन्यांच्या मद्यच्या बाटलीचे बनावट झाकणाचे उत्पादन सुरु असल्याचे आढळून आले. हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याच्या बाटलीची बनावट झाकण, हि झाकण तयार करण्यासाठी लागणाऱ्या ५ मोठ्या मशीन असा एकूण ४० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशाप्रकारे बनावट झाकण बनवणाऱ्या २ संलग्न कारखान्यांवर देखील छापेमारी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या दरम्यान तब्बल ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने ३ जणांना पोलीस कोठडी तर उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे