ब्रेकिंग
दिवा विकास प्रतिष्ठान शैलेश पाटील आयोजित रिलायन्स टॉवर येथे धूमधडाक्यात रास गरबा….
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता १६ ऑक्टो : दिवा विकास प्रतिष्ठान आयोजित श्री दत्तकृपा मित्र मंडळ , रिलायन्स टॉवर यंदा भव्य दांडिया रास गरबा आयोजित करण्यात आला असून प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. शैलेश मनोहर पाटील यांनी शारदीय नवरात्रौ उत्सवा निमित्त पहिल्याच दिवसी झालेल्या रास दांडिया मध्ये प्रचंड प्रतिसाद देत महिला, भगिनी, मुलामुलींनी व युवा वर्गाने सहभाग नोंदवला. अनेक तरुनींनी, महिला व तरुणांनी वेशभुषा करत आपली नृत्यातून आपली अदाकारी दाखवत भरघोस बक्षिसांची लयलूट केली व साडी, पैठणी व मोबाईल बक्षीस मिळवले.
दिवा विकास प्रतिष्ठानच्या नियोजनाची एक वेगळीच अनुभूती व वेगळेपण म्हणजे दररोज गरबा रसिकांना अनोखी भेट एक अँड्रॉइड फोन, महिलांसाठी पाच साड्या, मुलींसाठी पाच ड्रेस पिस, पुरुषांसाठी पाच शर्ट पिस पँट पिस, सुरुवाती पासून शेवटपर्यंत नाचणार त्यांच्या मध्ये विजेता निवडण्याचे काम प्रतिष्ठानचे पदाधिकारी करतात. त्याच प्रमाणे काल पहिला दिवस हाउसफुल्ल रास गरबा रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. माझी ताकद म्हणजे माझा कार्यकर्ता असे संबोधून मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविले आहे.प्रदीप पाटील (शाखा प्रमुख),अमोल म्हात्रे,अविनाश थोरात,जगदीश कदम,भरत मोहिते,जगदीश वारेकर,संतोष तांबे ,अमोल पाटील,मनोहर सपकाळ, ,संजय बोरसे,रुपेश लाड,अनिल विश्वकर्मा,रामजी जयस्वाल,महेश गुप्ता,उमेश साळवी,अशोक नरे,आदी पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत