बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

कोकण वासीयांसाठी दिव्यात भाजप चे आमदार नितेश राणे कडकडाडले,पालक मंत्री शिवसेनेचे ,महापौर शिवसेने चा,इथले नगरसेवक शिवसेनेचे पण दिव्यात साधं पोलीस स्टेशन नाही हे दुर्दैवी…

अमित जाधव-संपादक

कोकण वासीयांसाठी दिव्यात भाजप चे आमदार नितेश राणे कडकडाडले

पालक मंत्री शिवसेनेचे ,महापौर शिवसेने चा,इथले नगरसेवक शिवसेनेचे पण दिव्यात साधं पोलीस स्टेशन नाही हे दुर्दैवी–नितेश राणे(आमदार)

 

दिव्यात आज भारतीय जनता पार्टी च्या वतीने मा.आमदार नितेश राणे,आमदार निरंजन डावखरे यांना तीन जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी निमंत्रित करून चला दिवा घडवूया या शीर्षकाखाली भव्य सभा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी नितेश राणे यांनी दिव्यातील सत्ताधारी राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेला धारेवर धरत अनेक सुविधेपासून दिवा वंचित आहे.मी भरपूर दिवसा पासून दिव्याला जायचय म्हणत होतो माझ्या गाववाल्यांशी थोडं बोलायचंय असे म्हणत कोकणवासीयांना उद्देशून त्यांनी दिव्यातील समस्येचा पाढाच वाचला.पालकमंत्री शिवसेनेचे,ठाणे महापालिकेत महापौर शिवसेनेचा,इथले नगरसेवक शिवसेनेचे पण दिव्यात साधं पोलीस स्टेशन नाही फिरती गाडी पोलिसांची फिरत असते ही किती वाईट अवस्था दिव्याची,आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही पाण्याचा टँकर ने पाणी पूरवठा केला जात नाही पण दिव्यात टँकर शिवाय नागरिकांना पाणी नाही मिळत हे किती दुर्दैव,कोरोना काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री असून सुद्धा दिव्याची अवस्था बिकट होती तरी तुम्हाला कोणतंही निधीच विशेष पॅकेज जाहीर केलं नाही असे राणेंनी शिवसेनाला उद्देशून संताप व्यक्त केला
कोकनवासीयांनी समस्त भारतीय जनता पार्टीला साथ देऊन मी दिव्याच्या विकाससाठी पुढे येईल व कोणत्याही सुविधेपासून कोकणवासीय व दिवेकर वंचित राहणार नाही अशी हमीच त्यांनी घेतली पालकमंत्र्यांचा चा खरपुच समाचार घेतला कोकण वासीयांन प्रति आभार व्यक्त करत दिवा भाजपचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांचे देखील आभार मानले व सायंकाळी उशिरा प्रयन्त कार्यक्रम सुरू होता तसेच दिवा साबे गाव येथील भाजपचे अशोक बाबुराव पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे तर दिवा अगासन रस्त्यावरील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय व बेडेकर नगर येथील रोहिदास मुंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मा.आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी रोहिदास मुंडे व ज्योती पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासह साबे येथील अशोक पाटील ओमकार नगर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे प्रदेश सचिव संदीप लेले संघटक सरचिटणीस विलास साठे सरचिटणीस मनोहर सुखदरे उपाध्यक्ष विजय त्रीपाठी ठाणे शहर उपाध्यक्ष-नरेश पवार रेश्मा पवार,युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर ओबीसी उपाध्यक्ष विनोद भगत कार्यकारणी सदस्य विजय भोईर गणेश भगत मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे संघटक सरचिटणीस दिलीप भोईर सरचिटणीस समीर चव्हाण युवराज यादव युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग गुजराती सेल अध्यक्ष रमेश वोरा व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर मधुकर पाटील प्रवीण पाटील अंकुश मढवी नागेश पवार प्रशांत आबोणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते


ठाणे शहर अध्यक्ष व कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे कोकण चे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत दिव्यातील म्हातार्डी गाव मधले रोशन सदाशिव पाटील,प्रिती रोशन पाटील , बेतवडे गावचे दिलीप पाटील   बेतवडे गावचे दिलीप पाटील मयुरेश्वर नगर येथील बैधनाथ पाडी व सहकारी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे