Breaking
ब्रेकिंग

विलेपार्ले येथे घरे कोसळली सुदैवाने जीवितहानी नाही, नगरसेविका सुनीता मेहता यांनी केली इंदिरा नगर रहिवाश्याना मदत….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

विलेपार्ले येथे घरे कोसळली सुदैवाने जीवितहानी नाही

नगरसेविका सुनीता मेहता यांनी केली इंदिरा नगर रहिवाश्याना मदत

संजय बोर्डे

विलेपार्ले येथील इंदिरा नगर याठिकाणी अनेक घरे भिंतीला तडा गेल्यामुळे कोसळली याबाबत माहिती मिळताच नगरसेविका सुनीता राजेश मेहता यांनी घटनास्थळी धाव घेऊन येथील रहिवाश्याना मदत केली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले. आम्ही याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याशी सदर ठिकाणी भेट देऊन या रहिवाश्याना इतर ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत विचार करत आहोत. परंतु येथील रहिवाश्याना याच ठिकाणी घरे हवी असल्याने ती फार मोठी अडचण झाली असून यावर लवकरच तोडगा काढून या रहिवाश्याना न्याय देऊ. आतापर्यंत आम्ही या रहिवाश्यांना जेवणाची आणि निवाऱ्याची सोय केली असून अजून जे काही सहकार्य लागेल ते नक्कीच पुरवले जाईल अशी ग्वाही नगरसेविका सुनीता मेहता आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मेहता यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे