शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या राणे बंधुंवर ठाण्यात गुन्हा दाखल होणार राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पेन ड्राईव्हमधील पुराव्यांसह फिर्याद…
अमित जाधव-संपादक
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या राणे बंधुंवर ठाण्यात गुन्हा दाखल होणार
राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पेन ड्राईव्हमधील पुराव्यांसह फिर्यादआपली उंची किती, आपण बोलतो किती याचे भान ठेवावे – आनंद परांजपे
ठाणे प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरणार्या आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी फिर्याद दिली आहे. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणात योग्य तो गुन्हे दाखल करण्यासंदर्भात शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना आश्वासित केले आहे. दरम्यान, नितेश राणे थेट यांनी आपली उंची तपासावी आणि नंतरच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा. निलेश राणे हे पूर्वी रात्रीचे ‘औषध’ घेत होते. आता त्यांनी दिवसाही औषध घ्यायला सुरूवात केली असावी. त्यामुळेच ते काहीबाही बरळत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे शेकडो पद्धधिकारी उपस्थित होते