0
2
0
9
7
4
दिव्या मध्ये अय्यप्पा स्वामींना मानणारा मोठा वर्ग आहे. उद्योजक व विनोद भगत हे दिव्यामध्ये गेली अनेक वर्षापासून अयप्पा स्वामी महापूजा उत्सव करतात त्यामुळे यंदा होत असलेल्या कार्यक्रमात मोठा उत्साह संचारला आहे. उत्सवानिमित्त पहाटे होम हवन संपन्न झाले.
दुपारी महिला व पुरुष भाविकांनी मंदिर परिसर फुलांनी सजविला, संध्याकाळी दिवा साबे विठल मंदिर जवळील भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान महिलांनी मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली ताट व त्यामध्ये अर्धा नारळात दिवा प्रज्वलित केला होता. कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसर फुलांनी व दिव्यांनी उजळून निघाला होता. प्रसंगी विनोद भगत,अशोक पाटील, प्रकाश पाटील,प्रवीण बार्शीकर,कमलाकर पाटील तसेच श्री अयप्पा भक्त मोठया प्रमाणावर उपस्थित होते
0
2
0
9
7
4



