ठाण्यात आज रंगणार सौंदर्यंवतीची जुगलबंदी, *’मिस -मिसेस इंडिया नक्षत्र २०२२’महाअंतिम फेरी….
अमित जाधव-संपादक
ठाण्यात आज रंगणार सौंदर्यंवतीची जुगलबंदी, *’मिस -मिसेस इंडिया नक्षत्र २०२२’* महाअंतिम फेरी
ग्लॅमरच्या दुनियेत आणि सौंदर्यवतीसाठी बोध इंटरटेन्मेट घेऊन आले आहे. ‘मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२’. ठाण्यातील सौंदर्यवतीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बोध इंटरटेन्मेंट आयोजक सुबोध कांबळे गेली तीन वर्ष सातत्याने सौंदर्य क्षेत्रात स्पर्धेचे आयोजन करुन महिला वर्गासाठी भव्य असा मंच सादर करत आहे. अशा या *’मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२’* सौंदर्य स्पर्धेचं हे चौथे वर्ष असून आज १८सप्टेंबर २०२२ ठाण्यात महाअंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सौंदर्यवतींची निवड करण्यात आली आहे.
अलीकडेच या स्पर्धेचं बिगुल वाजलं. यावेळी सौ. अर्चना पवार ( मिसेस इंडिया नक्षत्र २०२१, ब्रँडअँबेसॅडर, शोस्टॉपर २०२२)आणि सार्था गोरे ( मिस इंडीया नक्षत्र २०२१ ब्रँडअँबेसॅडर, शोस्टॉपर २०२२) *’नक्षत्र २०२१’*
किताब मिळवलेल्या या दोघींही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ऑडिशनमधून निवड झालेल्या तरुणींना मार्गदर्शन केले आहे.
पारंपारिक पोशाखापासून इव्हिनिंग गाऊनपर्यंतची वेशभूषा आत्मविश्वासपूर्ण रीतीने परिधान करणे, कलागुणांची मांडणी, प्रसंगावधान, सामाजिक जाणीवा या सर्व स्तरांवर स्पर्धकांना जोखून या प्रत्येक स्तरावर दुस्तर होत गेलेल्या स्पर्धेतील नावे निश्चित करण्यात आली. *हेमलता गुप्ता, अनुष्का भुवड, प्रियांका मोरे, मिना मेरिया, स्नेहल अडसुळे, रेवयी अय्यर, वैशाली चव्हाण, ग्रीष्मा पाटील, सुप्रिया कांबळे* यासर्व स्पर्धकांना स्पर्धेत नावलौकिक मिळवण्याची संधी मिळणार आहे.
मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या, व त्यासाठी मेहनत करण्याची जिद्द असलेल्या या सौंदर्यवतींना प्रोत्साहन देण्यासाठी दिग्गजाची उपस्थिती आहे. या सोहळ्यासाठी एम. सी. एच. आय. क्रिडाई श्री. जितेंद्र मेहता (अध्यक्ष) अभिनेत्री नम्रता गायकवाड
धडक कामगार युनियन अभिजीत राणे (अध्यक्ष)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ श्री. नितिन शिंदे ( कोकण विभाग / ठाणे शहर : अध्यक्ष )
महाराष्ट्र नवनिर्माणसेना सौ. मंजुळा डाकी ( उपशहर अध्यक्षा / ओवळा माजिवाडा घोडबंदर विभार उपाध्यक्षा ),
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जितेंद्र पाटील ( ठाणे शहर : उपाध्यक्ष )यांची उपस्थिती आहे.



