नवतरुण विकास मंडळ धोपटवाडी (शीर ) तर्फे कार्तिकी एकादशी व सत्यनारायणाची महापूजा व प्रबोधन…
अमित जाधव (8652823485)
गुहागर तालुक्यातील शीर धोपटवाडी मध्ये “नवतरुण विकास मंडळ धोपटवाडी ” आणि “सुहासिनी महिला मंडळ धोपटवाडी” यांनी प्रतिवर्षी प्रमाणे प्रबोधिनी एकादशीचे अवचित साधत या ही वर्षी *दि.२२ नोव्हेंबर ते 2४ नोव्हेंबर रोजी तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे* या कार्यक्रमाला तालुक्यातील तसेच गावातील प्रमुख जेष्ठ अतिथी उपस्थिती लाभणार आहे.तालुक्यातुन विविध भागातुन विठु माऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. हा कार्यक्रम सलग तीन दिवस चालू राहणार आहे.या कार्यक्रमाची रुपरेषा बुधवार दि .२२/११/२०२३ रोजी सकाळी १० वाजता पालखी मिरवणूक आणि रात्री १० वाजता रेकॉर्ड डान्स तसेच, गुरूवार दि.२३/११/२०२३ रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती व अभिषेक सायंकाळी हरिपाठ व व्दादशी कीर्तन सेना मंडळाच्या वतीने (ह.भ.प.श्री.महेंद्र महाराज दणदणे यांचे हरी कीर्तन), रात्री भैरी भवानी प्रसादिक मंडळ शीर व मधली वाडी मंडळ शीर यांचे भजन आयोजित केलं आहे.व दि.२४/११/२०२३ रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजा , दुपारी १ वा. महिला हळदी कुंकू व ३ वाजता वरिष्ठ मंडळी/नेते यांचा जाहीर सत्कार समारंभ ,तसेच ५ वाजता भंडाराचे आयोजन तर सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांचा सत्कार समारंभ व रात्री १०.३० वाजता कोकणची “नमन” ही लोककला दाखवण्याची संधी यंदा नवोदित साई माऊली कलामंच (मुंबई) यांना देण्यात आली आहे. अश्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक/रसीक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आव्हान मंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लक्ष्मण धोपट ९८६७९६५५९६ / राम धोपट ९८२१२०८३४१ यांच्याशी संपर्क साधावा.