हॉस्पिटल आणि आरोग्यकेंद्र यामधील फरक न कळणाऱ्यांनी दिव्याच्या विकासावर बोलू नये” -अँड आदेश भगत, शिवसेना, उपशहरप्रमुख दिवा
अमित जाधव - संपादक
दिवा प्रभाग समिती अंतर्गत एकमेव आरोग्य केंद्र असून ते शिळफाटा येथे आहे. दिवेकर नागरिकांना या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी सात किलोमीटरचा अंतर पार करावे लागतं. चार ते पाच लाख लोकसंख्येच्या दिवा शहरात देखील एक आरोग्य केंद्र असावे आणि दिवावासीयांना त्याचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब व कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहरप्रमुख मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या पुढाकाराने दिवा शहरात देखील एक आरोग्य केंद्र येत्या महिन्याभरात दिवेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. या आरोग्य केंद्रासाठी महापालिकेने जागा भाडेतत्त्वावर घेतली असून येथे आरोग्य केंद्र सुरू केलं जाणार आहे. याच कामाची पाहणी शिवसेना शहर प्रमुख मा.उपमहापौर रमाकांची मढवी यांनी केली व महिन्याभरात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात येईल असे जाहीर केलं. भारतीय जनता पार्टी दिवा शहराने हे आरोग्य केंद्र आम्ही दहा दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनामुळे होत असल्याचा दावा करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. भाजप ने केलेलं आंदोलन हे हॉस्पिटल च्या मागणीसाठी होतं, त्यामुळे हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र यामधील फरक न कळणे म्हणजे आश्चर्य असल्याचे शिवसेना दिवा उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांनी संगितले आहे.
वास्तविक या आरोग्य केंद्राची जागा निश्चित करणे, जागा भाडेतत्त्वावर घेणे, मालकाशी भाडेतत्त्वाचा करार करणे, प्रशासकीय मंजुरी मिळवणे या सगळ्या गोष्टी पूर्वीच झाल्या असल्याने या आरोग्य केंद्राचा आणि भाजपच्या नौटंकी आंदोलनाचा काही एक संबंध नाही. हॉस्पिटल मंजूर असताना भाजपने केलेल आंदोलन हे सपशेल फ्लॉप ठरलं होतं व सदर आंदोलनाकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व ठाण्यातील वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली होती. याशिवाय या आंदोलनात दिवावासीयांचा देखील अत्यल्प प्रतिसाद लाभला होता. आपलं फ्लॉप झालेल आंदोलन सोशल मीडिया वर हिट करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करत आहे व यापूर्वीच आरोग्य केंद्राची जागा निश्चित करणे व इतर बाबी पूर्ण झालेल्या असल्याने आपल्याच आंदोलनामुळे हे झालं आहे असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती असल्याचे शिवसेना उपशहर प्रमुख अँड.आदेश भगत यांनी म्हटलं आहे. भाजपला आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल याच्यातला फरक कळत नाही हे दिव्यातील भाजपचे दुर्दैव आहे. दिवा भाजपची अवस्था ही समुद्रात भरकटलेल्या जहाजासारखी झाली असून दिव्यातील भाजप कधी मनसे सोबत तर कधी उद्धव ठाकरे गटासोबत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून दिवा शहरात अनेक विकास कामे होत असताना भारतीय जनता पार्टीला दिवा शहरात करण्यासारखे काही शिल्लक राहिले नसल्याने दिव्यातील भाजपचे नेतृत्व हे वैफल्यग्रस्त झालं आहे. आणि त्यामुळेच आपण नेमकी कोणती भूमिका घ्यावी या संभ्रमात दिवा भाजप असल्याचा जोरदार टोला अँड.आदेश भगत यांनी लगावला आहे.