दिव्यातील राजकारणात नवतरुणाची दमदार एन्ट्री!!! बहुजन समाज पार्टीने हेरला ‘हिरा’; आंबेडकरी चळवळीतील युवक सौरव आढांगळे यांना उमेदवारी जाहीर..
अमित जाधव - संपादक

दिवा (प्रतिनिधी) :दिवा शहरातील राजकारणात नव्या नेतृत्वाची दमदार एन्ट्री झाली असून बहुजन समाज पार्टीने आंबेडकरी चळवळीतील सक्रिय युवक सौरव आढांगळे यांना उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. सामाजिक चळवळीतून उभे राहिलेले सौरव आढांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
बहुजन समाज पार्टीने “कार्यकर्त्यातून नेता” घडवण्याच्या भूमिकेतून सौरव आढांगळे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे आंबेडकरी समाजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवर शिक्षण, बेरोजगारी, अनधिकृत बांधकाम, खाडी भराव, गायरान व गावठाण प्रश्नांवर सौरव आढांगळे यांनी ठाम भूमिका घेतली असून, “दिव्याचा विकास हा माझा अजेंडा असून सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचवणार,” असे त्यांनी यावेळी सांगितले.दिव्याचा विकास हा माझा अजेंडा असून सर्वसामान्यांचा आवाज *महानगरपालिकेत* पोहोचवणार
या उमेदवारीमुळे दिव्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



