मा. आमदार सुभाष भोईर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी केली नियुक्ती…
अमित जाधव-संपादक
मुंबई (प्रतिनिधी) दिवा शीळ येथील निवासी सुभाष भोईर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. कल्याण लोकसभेच्या कळवा ते अंबरनाथ दरम्यान शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात याच भागातील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भागातील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिंदे यांच्या बंडखोरीनंतर डोंबिवली ग्रामीण भागात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. २०१४ च्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात सुभाष भोईर यांना आमदार म्हणून निवडून आणण्यात एकनाथ शिंदे यांच्यासह डोंबिवली ग्रामीण शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे समर्थक गट आता मोठ्या ताकदीने भोईर यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. कल्याण, २७ गाव, अंबरनाथ, बदलापूर ग्रामीण भागात शिंदे समर्थक शिवसेना नव्याने उभी करताना शिंदे गटाला विशेष मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे