Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील अनधिकृत बांधकाम  सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांची मोठी कारवाई….

अमित जाधव - संपादक

0 2 0 7 5 8

ठाणे, दिवा ता ११ सप्टेंबर : दिवा प्रभाग समितीचे नवनियुक्त सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी आज दिवा शहरातील अनेक अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. आज सकाळ पासून सहायक आयुक्त अतिक्रमण विभागातील इतर अधिकाऱ्यांसह फौजफाटा घेऊन कारवाईचा बडगा उगारला. प्रचंड विस्तार होत असलेल्या दिवा शहरातील सुरु असलेल्या म्हसोबादेव नगर मधील चाळीमधील चार रूम तर ऐका सुरु असलेल्या इमारतीची प्लिंथ तोडण्यात आली. तसेच दिवा पूर्व येथील अँगल प्याराडाईस शाळेसमोरील नवीन इमारतीची प्लिंथ व सर्व उभे कॉलम तोडण्यात आले. यापुढेही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी दिव्यातील नागरी सुविधा, रस्ते, पाणी समस्या, स्वच्छता व घनकचराचा आढावा घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रसंगी दिवा प्रभाग समितीची अतिक्रमण विभागाचे श्री लहाने व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 7 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे