
दिवा :दिवा शहर येथील समाजसेवक व व्यवसायिक अमर बबन मोहिते यांचे वडील कै बबन शिवराम मोहिते यांचे शुक्रवार २० जून २०२५ रोजी हृदय विकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी उषा बबन मोहिते , २ मुले , ३ मुली ,बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नेहमीच शांत स्वभाव असणारे , तसेच सर्वांशी आपुलकीने वागणारे बबन मोहिते हे एक आदरतिथ्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने मोहिते परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६६ वर्षे होते.
डोंबिवली {नांदिवली}येथील समश्यानभूमीत शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात मोहिते कुटुंबीय, व नातेवाईक उपस्थित होते.त्यांचा दशक्रिया विधी दिनांक २९ जून रोजी होणार असून उत्तरकार्य बाराव विधी दिनांक ०१ जुलै रोजी कोलशेत खाडी,तालुका जिल्हा ठाणे येथे होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.