Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

कॉग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणीची खानापूर व जत येथे आढाव बैठक – राजाराम देशमुख….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

कॉग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणीची खानापूर व जत येथे आढाव बैठक – राजाराम देशमुख.

सांगली,
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती. सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार देशभरात सर्वत्र कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी डिजिटल सभासद नोंदणी ची मोहीम राबवण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी तफे॔ तालुका तसेच जिल्हा पातळीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची निरिक्षक पदी नेमणूक करण्यात आली.

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे सर्वश्री विश्वस्त मा.राजाराम देशमुख याच्यावर सांगली जिल्ह्यातील खानापुर व जत मतदारसंघाची पक्षनिरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली.याच अनुषंगाने राजाराम देशमुख यांनी कॉंग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणीसाठी आढाव बैठक घेतली.व कॉंग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त डिजिटल सभासद नोंदणी करण्यासंदर्भात त्यांनी पदाधिकारी व कार्यकते॔ यांना मार्गदर्शन केले त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळी
खानापुर तालुका कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री रवि आण्णा देशमुख व विटा शहर अध्यक्ष श्री सुरेश पाटील तसेच,मा.जिल्हा परिषद सदस्य मा. श्री सुहास नाना शिंदे, आटपाडी तालुका अध्यक्ष मा.श्री डी एम पाटील सर, मा.युवा जिल्हा उपाध्यक्ष श्री जयदीप भोसले, मा.मोहन खरात सर व पदाधिकारी,कार्यकते॔ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे