Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रियदर्शिनी विद्यामंदिर चारकोप कांदिवली पश्चिम येथील शाळेला स्मार्ट टी. व्ही. व डिजिटल अभ्यासक्रम संच भेट आणि प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

प्रियदर्शिनी विद्यामंदिर चारकोप कांदिवली पश्चिम येथील
शाळेला स्मार्ट टी. व्ही. व डिजिटल अभ्यासक्रम संच भेट आणि प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

मुंबई-गणेश हिरवे प्रियदर्शिनी विद्यामंदिर विद्यामंदिर व नाईट ज्युनियर-सीनियर कॉलेज मध्ये सेवा सहयोग फौंडेशन मुंबई व सुंदरम यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्मार्ट टी व्ही व डिजिटल अभ्यासक्रम यांचे चार संच भेट देण्यात येऊन त्यासंबंधी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेला सेवा सहयोग फौंडेशन चे पदाधिकारी मा विनय बर्वे सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. करोना काळात विद्यार्थी वर्गाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यावेळी शिक्षक वर्गाला आवाहन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मदत होऊन त्यांचा विकास व्हावा व यासाठी हे डिजिटल संच कुशलतापूर्वक कसे हाताळावे,उपयोगात आणावे याचे प्रशिक्षण सुंदरमचे प्रतिनिधी मा विनय व अक्षय यांनी याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी प्रियदर्शनि कॉलेजचे मुख्याध्यापक लाड सर,मराठी विभागाच्या मुख्याध्यापिका प्रणिता मॅडम,इंग्रजी व मराठी माध्यमांचे शिक्षक वृंद उपस्थित होते.यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विधपीठ प्रियदर्शनि कॉलेजचे केंद्र संयोजक वाघ सर व प्राध्यापक ईश्वर खैरनार अनिल पवार सर,पाटील सर सौ. सुलभा कदम मॅडम आदी मान्यवर हजर होते.भाबल सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, तर सौ.मीनाक्षी
ढमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे