सिंधुदुर्ग जिल्हा मित्रमंडळाचा हळदीकुंकु समारंभ उत्साहात संपन्न. ——–
अमित जाधव-संपादक
सिंधुदुर्ग जिल्हा मित्रमंडळाचा हळदीकुंकु समारंभ उत्साहात संपन्न. —————————————————————-डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-सिंधुदुर्गातील कोकणवासियांनी ‘सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळ’ही सामाजिक संस्था कार्यरत आहे.सध्या विविध संस्थांचे हळदीकुंकु समारंभ संपन्न होत आहेत,त्याच अनुषंगाने मकर संक्रांतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाने आशा टेलरींग क्लासेस,नरेश स्मृती,जुना आयरे रोड,डोंबिवली(पुर्व)येथे हळदीकुंकु सालाबादप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाच्या महिला सदस्यांनी आयोजित केला होता.महिलांना हळदीकुंकु,सवाशिण वाण,पुष,तिळगुळ देऊन हा सोहळा एकमेकांशी गोड बोलण्यासहीत अभिनंदन व शुभेच्छासहीत उत्साहात संपन्न झाला. या हळदीकुंकु समारंभात ७५महिलांनी सहभाग घेतला होता.याप्रसंगी अंबरनाथच्या प्रमुख अतिथी सौ.युगंधरा लाड यांनी बिझनेस संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.आशा कदम,सौ. पुनम कदम,सौ.प्रियांका राणे,श्रीमती सुचिता खानोलकर,सौ.पुजा राणे,सौ.शोभा राणे,सौ.प्रमिला सातवसे,सौ.स्नेहल मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच या कार्यक्रमाला संस्थेचे चिटणीस ज्ञानेश्वर सावंत,उपाध्यक्ष गोविंद म्हाडगुत,सदस्य मनोहर परब,सुरेश सावंत,विनोद राणे हे उपस्थित होते, या मान्यवरांनी हळदीकुंकु समारंभ यशस्वी केल्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.कोविड १९च्या नियमानुसार हळदीकुंकु समारंभ मर्यादित स्वरूपातच आयोजित करण्यात आला होता.