Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वयोवृद्ध दोन महिलांवर घरात घुसून बलात्कार, २२ वर्षीय नराधमाला बेड्या6y

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️वयोवृद्ध दोन महिलांवर घरात घुसून बलात्कार, २२ वर्षीय नराधमाला बेड्या.*

कल्याण, ता 28 मार्च ( संतोष पडवळ) : एका २२ वर्षीय नराधमाने ७० वर्षीय आणि ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलांवर घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. भूषण हिंदोळे, असे अटक केलेल्या नरधमाच नाव आहे.

दोन्ही पीडित वयोवृद्ध महिला शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. २० मार्चला एक वयोवृद्ध महिलेला घरात एकटीला पाहून नराधम घरात घूसूला होता. त्यानंतर पीडितेला ठार मारण्याची धमकी देत या नराधमाने घरातच पीडितेवर बलात्कार केला. मात्र, घडललेल्या घटनेनंतर पीडित महिला भयभीत झाली होती. त्यामुळे या नराधमाने याचाच फायदा घेत पुन्हा २१ मार्चला शेजाऱ्याच्या घरात एकटी असलेल्या दुसऱ्या वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून धमकी देत बलात्कार केला. सतत दोन दिवस घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर २३ मार्चला दोन्ही वृद्ध पीडित महिलांनी वाशिंद पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच नराधमावर अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी भूषण हिंदोळे या नराधमास वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून २५ मार्चला अटक केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे