♦
जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने मदत व पुनर्वसन शिबीर -संजय बोर्डे
23 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाच्या औचित्य साधून नालंदा बुद्ध विहार दामू नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी सामाजिक विकास प्रतिष्ठान व आर्यन सामाजिक संस्था यांच्यावतीने
दिव्यांग मतिमंद लोकांसाठी मदत व पुनर्वसन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मिळणाऱ्या विविध सुविधा विविध उपकरणे उद्योग धंदा साठी लागणारी मदत. यासाठी सर्व परी मदत करून फॉर्म भरण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कांदिवली विधानसभेचे आमदार व भाजपाचे मुंबई प्रभारी अतुल भातखळकर हे उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी छाया यादव या सुद्धा या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. दिव्यांग लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना उपदेश करण्यासाठी माईंड ग्रोथ ट्रेनर विनोद निकम
हे मार्गदर्शन करणार आहेत.काशिनाथ नरवडे ,महिला समाज सेविका स्नेहा पवार यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते या शिबिरास उपस्थित राहणार आहेत. उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व दिव्यांग लोकांनी व त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सुनील गायकवाड ७०३९३९१०४४, ऋषिकेश बोर्डे८६५२२७४५८०यांना दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


