ठाणे वाहतूक विभागाचे कठोर निर्णय, चौथा प्रवासी बसविल्यास होणार कारवाई, शिवशक्ती रिक्षा युनियन चां प्रवासी व रिक्षा चालकांना दिलासा…
अमित जाधव - संपादक
ठाणे ऑटो रिक्षा व प्रवाशियांसाठी पोलिस आयुक्तालय मार्फत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.ऑटो रिक्षामध्ये ओव्हर शीट/फ्रंट शीट प्रवाशी बसणार नाही. प्रवाशी बसविल्यास मोटार वाहन कायदा कलम १२५/१७७ व १८४ प्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच सदर चालकाचे परिमट / लायसन्स रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येणार आहे. ओव्हर शीट ऑटो रिक्षाचा अपघात झाल्यास विमा भरपाई मिळत नाही असे वाहतूक उपयुक्त यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहेत यास ठाणे वाहतूक विभागाच्या नियमांना धरून दिव्यातील शिवशक्ती रिक्षा मालक चालक संघटनेने पाठिंबा देत वाढते सी एन जी दर पाहता रिक्षा चालकाचा देखील रोजगाराचा प्रश्न उपस्थित होत आहे म्हणून चौथ्या सीट वर प्रवासी न घेता युनियन ने तुटपुंजी भाडेवाढ करत तीन प्रवासी घेऊन रिक्षा चालकांना दिलासा दिला आहे ही युनियन ने तीन ते चार वर्षांनी भाडे वाढ केली आहे त्यामुळे हेच प्रवाशी व चालकाने आपल्यामधील आर्थिक भेदभाव न करता सन्मानाने सहकार्य करावे व कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.
परंतु जर रिक्षा चालकांनी तीन प्रवाशी घेऊन चौथा प्रवासी सुध्दा घेतल्यास प्रवसियानी पूर्वी प्रमाणेच दर द्यावे व वाहतूक पोलिसान मार्फत त्यावर जी कठोर कारवाई होईल त्यास संघटना जबाबदार नसेल असे यावेळी अध्यक्ष विनोद भगत यांनी स्पष्ट केले