दिव्यातून दोन वर्षासाठी तडीपार असलेला आरोपी मोकाट फिरताना दिवा,सुरेश नगर येथून अटक….
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता १ जुलै : मनाई आदेश भंग केलेला आरोपी प्रथमेश एकनाथ जाधव, वय 20 वर्षे, रा.सुरेशनगर, दिवा पुर्व, जि.ठाणे यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, ठाणे यांनी ठाणे जिल्हयाचे महसुली हद्दीतुन 2 वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश दि.14.06.2023 रोजी दिले होते. परंतू सदर आरोपीने परवानगी शिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना देखील आदेशाचा भंग करून, दि.30 जून २०२३ रोजी रात्रौ 20.45 वा. चे सुमारास सुरेशनगर, दिवा पुर्व येथे मुंब्रा पोलिसांच्या पथकास मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. II 684/23 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रथमेश एकनाथ जाधव, वय 20 वर्षे यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षण शहाजी शेळके व दिवा तपास पो. ह.सुभाष मोरे,पो.शी.प्रमोद शिंदे ,पो.गायकवाड आदी पथकाने कामगिरी केलेली असून पुढील तपास पोलीस नाईक जयेश तामोरे करत आहेत