- उष्माघातामुळे मुलीचा मृत्यू
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच पालघरमधील विक्रमगडच्या केव गावात उष्माघातामुळे एका मुलीचा मृत्यू झाला. अश्विनी रावते असे या मुलीचे नाव आहे. कॉलेजमधून घरी आल्यानंतर ती शेतात आईकडे निघाली होती. तेव्हा उन्हामुळे भोवळ आल्याने ती शेतात कोसळली. या वाटेवर कोणीच दुपारी येत, जात नसल्याने ती तब्बल दोन तास बेशुद्धावस्थेत तशीच पडून होते. यात तिचा मृत्यू झाला.