Breaking
ब्रेकिंग

मुंबई प्रसिद्ध हॉटेल मध्ये चिकन थाळीत आढळले उंदराचे मांस…,

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

एका प्रसिद्ध ढाब्यात ग्राहकाने मागवलेल्या जेवणात उंदीर  आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या ग्राहकाने ढाबा मालकाला जाब विचारला असता, त्याने चुक मान्य न करता, टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने आता ढाबा मालक आणि आचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी आयपीसी कलम 272, 336 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनुराग सिंह आपल्या मित्रासोबत वांद्रे पश्चिमेतील पाली परिसरातील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. यावेळी अनुराग यांनी चपातीसोबत चिकन आणि मटण थाळी ऑर्डर केली होती. जेवण टेबलावर आल्यानंतर अनुराग आणि त्याच्या मित्रांनी जेवायला सुरुवात केली होती. जेवताना त्यांच्या थाळीत एक असा मांसाचा तुकडा मिळाला, जो खूपच वेगळा दिसत होता. ज्यावेळी त्यांनी या मांसाच्या या तुकड्याला निरखून पाहिले तेव्हा त्यांना हा तुकडा उंदराचं मांस वाटलं. त्यामुळे अनुराग या घटनेने संतप्त झाले आणि त्यांनी ढाबा मालकाला जाब विचारला होता.पुढील चौकशी मुंबई पोलीस करीत आहेत
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे