Breaking
नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील प्रभाग २८ चे उमेदवार दीपक जाधव पुन्हा जनतेच्या विश्वासावर…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 0 8

ठाणे ता १० जाने : दिव्यातील शिवसेनेचे उमेदवार दिपक नामदेव जाधव हे प्रभाग क्र. २८ मधून पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासावर उभे आहे. प्रचारा दरम्यान सवांद साधताना मतदारांना आवाहन करत केलेल्या कामाची दखल घेऊन पोहचपावती देतील असे स्पष्ट केले. ही उमेदवारी माझ्यासाठी नवीन नसून २०१७ साली आपण प्रचंड मताधिक्याने दाखवलेला विश्वास हाच माझ्या प्रत्येक कामाचा पाया राहिला आहे. राजकारण म्हणजे केवळ पद नसून सामान्य माणसाशी जोडलेली नाळ आहे, असे मी कायम मानतो. त्यामुळेच माझा प्रत्येक दिवस प्रभागातील गल्ली बोळांत, घराघरांत आणि नागरिकांच्या प्रश्नांमध्ये गेला आहे. दांडगा जनसंपर्क, थेट संवाद आणि तात्काळ निर्णयक्षमता हीच माझ्या कामाची खरी ओळख बनली आहे.

सन २०१७ पासून आजपर्यंत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण, पथदिवे व ड्रेनेज व्यवस्थेसारख्या मूलभूत प्रश्नांवर कोणताही भेदभाव न करता काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणे, त्यावर सातत्याने पाठपुरावा करणे आणि शेवटपर्यंत न्याय मिळवून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो. विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात संपूर्ण यंत्रणा तणावाखाली असताना ते एक कोरोना योद्धा म्हणून जनतेच्या सोबत उभा राहिलो. गरजू नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणे, औषधोपचारासाठी मदत करणे, रुग्णालयांशी समन्वय साधणे आणि भीतीपोटी कोणीही एकटे पडू नये यार्च काळजी घेणे ही कामे केवळ जबाबदारी म्हणून नव्हे तर मानवी कर्तव्य म्हणून केली. आजही नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत मी त्यांचा आधार बनून उभा आहे. आपल्या विश्वासावर अधिक सक्षम, अधिक सुरक्षित आणि अधिका विकसित प्रभाग घडवण्याचा माझा संकल्प कायम आहे. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे