दिव्यात राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला मुंब्रा RPF च्या दोन अधिकाऱ्यांनी मारहाण करत बोटाला केली गंभीर दुखापत…
अमित जाधव-संपादक
*दिव्यात राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला मुंब्रा RPF च्या दोन अधिकाऱ्यांनी मारहाण करत बोटाला केली गंभीर दुखापत…*
*न्याय नं मिळाल्यास पिडीत रामदयाल यांनी आत्महत्या करण्याचे केले विधान..!*
मुंब्रा RPF पुन्हा वादाच्या भोहऱ्यात;
दिव्यांग व्यक्तीला मारहाण करत केले बोट फँक्चर
मुंब्रा (प्रतिनिधी -) : मुंब्रा RPF ची दबंगगिरी पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. मुंब्रा RPF अधिकारी यांनी दिव्यात राहणारे दिव्यांग व्यक्ती रामदयाल गुप्ता यांना रेल्वेत आणि ठाणे स्थानकावर मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलायं. त्यामध्ये राम द्याल यांच्या उजव्या हाताचे बोट देखील फॅक्चर झाल्याचे समजते.
राम दयाल गुप्ता यांनी दिवा स्थानकातून दिनांक 5 मे 2022 रोजी, सीएसटीच्या दिशेने जाणारी सकाळी साडे 9 च्या आसपार रेल्वे पकडली. दिव्यांग असल्याने ते दिव्यांग डब्ब्यात चढले. मात्र दिव्यांग डब्ब्यात गर्दी होती त्यांनंतर मुंब्रा स्थानकावर गाडी पोहचली आणि गाडीत मुंब्रा रेल्वे RPF चे 2 अधिकारी… अभिषेक व सत्यवीर चढल्याचे राम दयाल यांनी सांगितले.
त्यांनी प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी डब्ब्यात धक्का दिला जात असल्याने याचा त्रास दिव्यांगांना होत असल्याचे राम द्याल यांनी RPF अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र; RPF अधिकाऱ्यांनी राम द्याल यांचे न ऐकल्याने रामदयाल यांनी त्यांच्या मोबईलमध्ये व्हिडीओ बनविण्यासाठी सुरूवात केली. मात्र; RPF अधिकाऱ्यांनी व्हिडीओ जबरदस्ती डिलेक्ट करून त्यांना मारहाण केल्याचे स्वत: पिडीत राम द्याल यांनी सांगितले. त्यानंतर माफी मागून सुद्धा जबरदस्ती टिकिट नसल्याचे सांगत रामद्याल यांना ठाणे स्थानकावर मारत उतरविले. त्यानंतर मुंब्रा RPF चौकीला त्यांना मेडिकल न करता काही काळ बसवून ठेवले.
याचं सर्वांमध्ये मुंब्रा RPF हेड राजश्री आहेर यांनी त्यांना छेडछाड केल्याचा आरोप लावण्याची धमकी दिली असल्याची माहिती राम द्याल यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेल असा थेट इशारा देखील रेल्वे प्रशासनाला राम दयाल यांनी दिलायं.
त्यामुळे रेल्वेत टिकिट तपसण्याचा अधिकार RPF अधिकाऱ्यांना रेल्वेने दिलाय का.. ? तसेच वारंवार मुंब्रा RPF विरूद्ध तक्रारी येऊन सुद्धा रेल्वे प्रशासन कोणत्याही प्रकाराची चौकशी का करत नाही.. असे प्रश्न राम द्याल यांनी ट्विटरवर केलेल्या तक्रारीत मुंब्र् व दिव्यातील नागरिकांकडून उपस्थित होऊ लागलेत.