मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्यालाही हेल्मेटसक्ती,नियम न पाळल्यास होणार कारवाई….
अमित जाधव-संपादक
मुंबई, 25 मे : तुम्ही टू-व्हीलर, दुचाकीवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता बाईकवर फिरताना मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. मुंबईत आता दुचाकीवरून प्रवास करताना मागे बसणाऱ्या पिलियन रायडरलाही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे.मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट वापरणं बंधनकारक होणार आहे. जर दोन्ही रायडरनी हेल्मेट घातलं नसेल तर कारवाई करण्यात येणार आहे.
येत्या 15 दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार आहे. या नव्या नियमाबाबत वाहतूक पोलिसांचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. हेल्मेट न वापरल्यास 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद या नव्या नियमांतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुठेही जाताना बाईक चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे.