दिव्यात घरगुती वादातून कौटुंबिक पतीकडून पत्नीची हत्या,aआरोपी पतीला काही तासातच मुंब्रा पोलिसांनी केली अटक..
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता १५ सप्टेंबर : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट परिसरात पती पत्नीचा कौटुंबिक व घरगुती वादामुळे पतीने राहत्या घरातच धारदार हत्याराने पत्नीवर वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपी प्रितेश शिर्के राहणार तान्हाजी म्हात्रे चाळ क्र ७ रूम क्र ७ म्हात्रे गेट दिवा पुर्व याने पत्नी द्रौपदी शिर्के यांस किचन मध्ये कौटुंबिक वादातून धारदार हत्याराने वार करुन हत्या केली नंतर मयत पत्नीच्या नातेवाईकास फोनवर कळवून फरार झाला आहे. प्रसंगी घटनास्थळी दिवा (मुंब्रा) पोलीस दाखल होऊन सदर महिलेचा मृतदेह पुढील कारवाईसाठी कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पीटलला पाठवला आहे.
सदर आरोपी हत्या करून फरार झाला होता प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा 1909/2024, बी एन एस 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा (दिवा) पोलिसांनी काही तासात त्याचा शोध घेवून रत्नागिरी भागातून अटक करण्यात आली आहे. प्रकरणी घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त बुरसे, उत्तम कोळेकर सह पोलिस आयुक्त तसेच वपोनि अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी भेट दिली असून सदर गुन्ह्याची उकल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे सो यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र तोरडमल, के. के. तांबे, अमोल कोळेकर, पो. नाईक तामोरे, पो. ह गंगावणे व पो ह. जाधव यांनी सदरची केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल हे करत आहेत.