Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील कपिल रोडे यांची दिल्लीतील मानवधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट महाराष्ट्रात कोकण विभाग सचिव पदी नियुक्ती…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे, दिवा ता १६ मे : दिव्यातील समाजसेवक कपिल रोडे यांची नवी दिल्लीतील नावाजलेली मानवधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट या (आयएसओ) नामांकित संघटनेत महाराष्ट्रात कोकण विभाग सचिव पदी नेमणूक करण्यात आली आहे. कपिल रोडे हे ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात राहत असून अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमास त्यांनी मोलाचे योगदान दिलं आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून दिवा शहरात नावलौकिक मिळवला आहे. याचीच दखल घेत

मानवधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांनी संधी देत महारष्ट्र राज्याच्या कोकण विभाग सचिव पदी नियुक्त केले आहे. कायम संघटन वाढीसाठी व जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच कार्य तत्पर राहील व मानवधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेल असे कपिल रोडे यांनी यावेळी बोलताना सागितले. सहकारी, राजकीय मित्र मंडळी , कुटुंब परिवार, अनेक संघटना त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे