Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबईत मध्य रेल्वेने प्लेटफ्रॉम तिकीट दारात केली 80 टक्के वाढ,उद्या 9 मे पासून दरवाढ लागू होणार…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*मुंबईत मध्य रेल्वेने प्लेटफ्रॉम तिकीट दारात केली 80 टक्के वाढ…..*

*उद्या 9 मे पासून दरवाढ लागू होणार….*

एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या (आपत्कालीन साखळी) ३३२ घटना घडल्या आहेत. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या आहेत. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेनं मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात तब्बल ८० टक्के भाडेवाढ केली आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिली आहे. संबंधित वाढ उद्यापासून म्हणजेच ९ मे २०२२ पासून २३ मे २०२२ दरम्यानच्या १५ दिवसांसाठी केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे