झेप प्रतिष्ठान च्या वतीने ठाण्यात हार फुले विकणाऱ्या बांधवांना नाष्टा वाटप..
अमित जाधव - संपादक
झेप प्रतिष्ठान तर्फे आज जांभळी नाका ठाणे येथे हार फुले विकणाऱ्या आदिवासी बांधवांना चहा आणि नाष्टा वाटप करण्यात आला. दिवाळीच्या सणात रात्र दिवस फुटपाथ वर राहून हार विकून उदर निर्वाह करणाऱ्या महिला, पुरुष आणि त्यांच्यासोबत आलेल्या लहान मुलांना चहा, पोहे आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या पुढे दिवा लावून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी झेप प्रतिष्ठानचे अनिल औताडे, योगेश खाकम, संदीप गोळे, मनोज महाडिक, संतोष उतेकर आणि डॉ कल्पेश सेठ उपस्थित होते तर अत्यंत कमी वेळात चहा आणि पोहे यांची व्यवस्था आमचा मित्र आणि पंढरपुरी चहा स्टॉल मालक सागर सिनलकर यांचेही आभार..
यासारखे उपक्रम केले नाही तरी चालतील पण फक्त या लोकांकडून काही घेताना घासाघीस करू नका ही विनंती..या व्यवसायाने त्यांचे फक्त पोट भरणार आहे..ते काही बंगला बांधणार नाहीयेत.