Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

दिव्यात टोळक्याकडून दोघांवर सपासप वार…..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
ठाणे, दिवा ता २ डिसें : दिव्यात परप्रांतीय टोळक्याकडून दोघांवर गंभीर हल्ला केल्याची घटना घडली आहे त्यात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दिवा शहरातील गणेश पाड्यात रात्री ९ : १५ वाजताच्या सुमारास परप्रांतीयाकडून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गेल्या महिना भरातील ही दुसरी घटना घडली आहे. प्रकरणी आरोपीला मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिसांकडून मुख्य आरोपी ऋतिक दुबे यासह ५/६ जणांना अटक करण्यात आले आहे.
अभिषेक पाटील (वय 22) व सुमित गावडे (वय 22) या दोघांवर मुख्य आरोपी ऋतिक दुबे यासह इतर ६/७ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले.
गंभीर जखमी झालेला अभिषेक पाटील (वय 22) याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमी सुमित गावडे वर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलयात उपचार सूरु आहेत. ठाणे महानगर पालिका हद्दीतील दिवा शहरातील गणेश पाडा, गणेश नगर, दिवा पूर्व येथील घटना आहे. प्रकरणी काही आरोपी पळून गेले असून आरोपी ऋतिक दुबेसह ५/६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास व कारवाई सुरु आहे.
3.6/5 - (39 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे