बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाण्यातील भ्रष्टाचाराविरोधातील प्रदर्शनास, पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्याबाबत सातत्याने टाळाटाळ!

अमित जाधव-संपादक

भ्रष्टाचाराविरोधातील प्रदर्शनास, पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्याबाबत सातत्याने टाळाटाळ!

ठाणे दि : ठाणे शहरातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात लोकशाहीमार्गाने, छायाचित्र प्रदर्शन भरविण्यासंदर्भात, वारंवार नौपाडा पोलीस स्टेशन यांना, सनदशीर पत्रव्यवहार करुनही, संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून, ठाण्यातील समाजसेवक अजय जेया यांना, सातत्याने परवानगी नाकारण्यात येत आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, समाजातील अनिष्ट, अनधिकृत, अनैतिक आणि बेकायदेशीर प्रकारांना लोकशाहीमार्गाने विरोध करणे आणि त्यातून सामाजिक जनजागृती करणे, हा संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार असून, तोच अधिकार डावलण्याचा प्रकार नौपाडा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी त्यांनी, नौपाडा परिसरातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात, भ्रष्टाचाराचे प्रदर्शन भरवले होते. त्याला ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर, होताच मात्र, त्याचबरोबर ठाण्यातील भ्रष्ट लोकप्रतिनिधींचे धाबेदेखील दणाणले होते. या प्रकरणी ठाण्यातील राजकीय नेत्यांनी पोलीस प्रशासनावर, दबाव आणून लोकशाही आणि सनदशीरमार्गाने भरवल्या जाणाऱ्या भ्रष्टाचारविरोधी प्रदर्शनाला परवानगी न देण्याचा मार्ग अवलंबला असून, त्यामुळेच पोलीस प्रशासनाकडून भ्रष्टाचारविरोधी प्रदर्शनास परवानगी देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे, समाजसेवक अजय जेया यांनी, ठामपणे आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे