बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ठाकरे गटाच्या युवा सेनेची पदाधिकारी जाहीर,दिव्यातून अभिषेक ठाकूर यांची नियुक्ती….

अमित जाधव - संपादक

ठाणे दि. २३ (प्रतिनिधी) – शिवसेना – (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कल्याण लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

जिल्हा युवा अधिकारी : महेंद्र म्हात्रे (अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याण पूर्व विधानसभा). उपजिल्हा युवा अधिकारी : स्वप्नील पावशे ( कल्याण ग्रामीण विधानसभा), प्रथमेश गायकर (मुंब्रा-कळवा विधानसभा). विधानसभा युवा अधिकारी : सूरज जाधव ( कल्याण ग्रामीण विधानसभा), अश्विन म्हात्रे (मुंब्रा-कळवा विधानसभा). तालुका युवा अधिकारी : जयेश म्हात्रे (कल्याण ग्रामीण तालुका).
शहर युवा अधिकारी : आकाश सोनावणे (उल्हासनगर शहर), प्रसाद टुकरुल (डोंबिवली शहर पूर्व), राहुल चौधरी (डोंबिवली शहर पश्चिम), अभिषेक ठाकूर
(दिवा शहर), विनोद पाटील (मुंब्रा शहर), विक्रम गायकर (कळवा शहर). सदर नियुक्त्या चा कार्यकाळ एक वर्षासाठी असून पुढील पदाधिकारी यांचे कार्य पाहू न निर्णय घेण्यात येईल.
दिव्यातील तरुण चेहरा व संयमी नेतृत्व करणारे अभिषेक ठाकूर यांची नियुक्ती दिवा शहरातून करण्यात आली त्यामुळे अनेक युवा वर्ग आनंदात असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे