दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी लवकरच सुसज्ज शौचालय आणि स्नानगृह खुले होणार* *नवीन शौचालय व स्नानगृहात प्रवाशांकडून वापर शुल्क घेऊ नये, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
अमित जाधव - संपादक

दिवा स्थानकात नऊ फलाट असून सद्यस्थितीला एकही शौचालय नाही. दिवा स्थानकातून कोकण, पनवेल, वसई, मुंबई, कर्जत व कसाऱ्याच्या दिशेने लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. उपलब्ध आठ फलाटावर प्रवाशांसाठी शौचालय नसल्याने प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत होती. दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या सतत च्या मागणी नंतर व स्थानिक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दिवा स्थानकात दोन नवीन शौचालय व स्नानगृहाच काम सुरू झाले असून लवकरच ते पूर्ण होऊन कार्यान्वित होणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील बहुतांश स्थानकात शौचालय वापरासाठी प्रवाशांकडून शुल्क आकारलं जात असून ते वसूल करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या एजन्सी नेमल्या आहेत. सदर नियुक्त एजन्सी कडून शौचालय देखरेख व शुल्क जमा करण्यासाठी बऱ्याच वेळा गर्दुल्ले बसल्याचे चित्र बघायला मिळतं असून याविरुद्ध अनेक प्रवाशांनी तक्रारी सुद्धा केल्या आहेत.
दिवा स्थानकात अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर व संघर्षानंतर नवीन सुसज्ज शौचालय आणि स्नानगृह तयार झाले असून सदर शौचालय लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुले करावे व नवीन शौचालय व स्नानगृह वापरासाठी रेल्वे प्रवाशांकडून कोणतेही वापर शुल्क घेऊ नये, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड आदेश भगत यांनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.