ब्रेकिंग
दिवा मनसेच्या मयुरी तेजस पोरजी महिलांसाठी “बाईचे बाई पण…शो चे केले आयोजन…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
ठाणे – दिवा – केदार जाधव निर्मित मराठी चित्रपट बाईपण भारी देवा या सिनेमाला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, सिनेमाच्या उत्कृष्ट कथानकामुळे चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटाला महिला प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मनसे विभाग अध्यक्षा सौ.मयुरी तेजस पोरजी यांनी दिव्यातील महिलांसाठी एका खास शोचे आयोजन एक्सपिरिया मॉल, पलावा, डोंबिवली येथे केले होते. या कार्यक्रमाला दिव्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील, शहर सचिव तेजस पोरजी, उपशहर अध्यक्ष मोतीराम दळवी, विभाग अध्यक्षा मयुरी पोरजी, विभाग सचिव संतोष पाटील, परेश पाटील, मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते
*
0
2
0
9
7
4



