Breaking
ब्रेकिंग

ठाणे काल्हेर येथील नोबल गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेकडून भव्य वृक्षारोपण,शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी लावली झाडे…..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे ता ११ ऑगस्ट : नोबल गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल काल्हेर, भिवंडी, ठाणे यांच्यातर्फे आज भव्य असे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रम काल्हेर येथील पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी रोडवरील रेतीबंदर रोड येथे पार पडला. इयत्ता ५ वी ते १२ वीच्या एकूण २५० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनीं सहभागी होऊन वृक्षारोपण करण्यापुर्वी ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन “पंचप्रण शपथ” घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय ते रेतीबंदर मैदान असी रॅली काढून रेतीबंदर परिसरात आली. सदर रॅलीमध्ये निसर्ग संवर्धना संदर्भात विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले.

सदर वृक्षारोपण प्रसंगी प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन अधिकारी मा. विश्वजीत मोहंती यांनी रिबन कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर मुख्याध्यापिका प्रियंका मोहन यांनी भूमिपूजन केले. तदनंतर विश्वजीत सरांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व संवर्धना संदर्भात उद्बोधन केले. तर वाढदिवशी एके तरी झाड लावून साजरा करा असे आवाहन केले. प्रसंगी विजय सर व इतर शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” असे म्हणत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे