Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबई इंडियन्सच्या नावात झाला मोठा बदल,तीन नवीन टीम सहित जगात पोहचत मुबई चे नाव : पाहा काय असणार नवीन नावं…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मुंबई इंडियन्सच्या नावात झाला मोठा बदल : पाहा काय असणार नवीन नावं

*मुंबई :* आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक जेतेपद पटकावले आहे. मात्र आता मुंबई इंडियन्सच्या संघाचे नाव बदलले आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपला विस्तार वाढवला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रेंचायझीने दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती लीगमधील संघ ताब्यात घेतले आहेत. मुंबई इंडियन्सच्या मालकांनी बुधवारी यूएई इंटरनॅशनल ट्वेंटी-20 लीग आणि दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-20 लीगमधील त्यांच्या दोन नवीन फ्रँचायझींची नावे जाहीर केली. हे संघ भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या मालकीचे आहेत.

UAE लीगचे फ्रेंचाइजी नाव ‘MI Emirates’ असेल, तर दक्षिण आफ्रिकन लीगचे नाव ‘MI केप टाउन’ असेल. दोन्ही संघ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीप्रमाणेच जर्सी घालतील. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत निवेदनानुसार, यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-20 लीगमधील फ्रँचायझींची नावे तेथील विशिष्ट प्रदेशांना लक्षात घेऊन ठेवण्यात आली आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “नवीन संघ मुंबई इंडियन्ससारखे असतील. कुटुंबाचा जागतिक विस्तार नक्कीच लीगची मूल्ये पुढे नेईल, त्यामुळे मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला क्रिकेट जगतात अधिक प्रेम आणि आदर मिळेल.” रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका नीता अंबानी म्हणाल्या, “मला विश्वास आहे की ‘एमआय एमिरेट्स’ आणि ‘एमआय केप टाउन’ दोन्ही संघ चांगली कामगिरी करतील आणि मुंबई इंडियन्सचा जागतिक क्रिकेट वारसा अधिक उंचीवर नेतील.”

मुंबई इंडियन्सचा आता विस्तार झाला आहे. आता मुंबई इंडियन्सचे तीन संघ वेगवेगळ्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. या संघांची नावे बदलली असली तरी त्यांची जर्सी सारखीच असेल. मात्र यावेळी संघातील खेळाडूंबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आयपीएलचे खेळाडू या लीगमध्ये खेळू शकतील की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या दोन्ही लीगमध्ये नेमके कोणते खेळाडू संघाचा भाग असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे