Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वाट (एक नवी दिशा) या उत्कृष्ट मराठी लघुकथेला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार 2022 जाहीर….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

वाट (एक नवी दिशा) या उत्कृष्ट मराठी लघुकथेला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार 2022 जाहीर

लेखिका ज्योती किरतकुडवे (साबळे) लिखीत वाट (एक नवी दिशा ) या लघुकथेला डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने युवा संघर्ष पुरस्कृत युवा साहित्य पुरस्कार- २०२२ मिळाला. ज्योती ताई या नेहमीच सामाजिक विषयावर लिहीत असतात. त्यांची वाट (एक नवी दिशा ) ही लघुकथा निराधार व वंचित मुलांना शिक्षण मिळण्यासंदर्भात आहे.
ज्योती ताई या समाजसेविका व लेखिका असून त्या समाजातील वंचित, निराधार, उपेक्षित यांच्या शैक्षणिक हक्कासाठी नेहमीच अग्रेसर असतात.
आता पर्यंत त्यांची ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नेहमीच सामाजिक क्षेत्रात लेखन करणाऱ्या या लेखिकेचा सम्मान करून डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने त्यांच्या लेखणीला न्याय दिला आहे. वंचित व निराधार मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे असे मत ज्योतीताई यांनी यावेळी व्यक्त केले.
डेमोक्रेटिक युथ फेडरेशन इंडियाचे १२ वे अधिवेशन उंबरठाण, ता. सुरगाणा, जिल्हा नाशिक येथे सुमारे १० ते १२ हजार जनसमुदायाच्या समोर तसेच डी वाय एफ आय चे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ज्योतीताईंना मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी लेखक आनंद पारगावकर, संजय साबळे, किरण किरतकुडवे, आर्यन किरतकुडवे हे ही उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे