Breaking
ब्रेकिंग

दिवा शहर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला, यंदा दिव्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार जिंकतील मोठ्या मतधिक्याने… योगिता नाईक

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8

ठाणे, दिवा ता १२ ठाणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक २८ मधिल सर्व जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा ठाम विश्वास कल्याण ग्रामिण विधानसभा सांघटिका योगिता हेमंत नाईक यांनी व्यक्त केला.

दिवा शहर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे. मागील निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात पक्षाने दिलेले आठ उमेदवार उद्धव साहेबांवर विश्वास ठेऊन दिवेकरांनी आठच्या आठ मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले परंतू कालांतराने त्या पैकी सात नगरसेवक वेगळे झाले. परंतू दिवा शहरात माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी पुढे येऊन पक्ष पुन्हा या दिवा शहरात मोठ्या प्रमाणात उभा केला व नागरिकांच्या अनेक अडचणी सोडवत राहिले. त्यामुळे आज पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवा शहरातील नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील आठच्या आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन दिवेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवतील असा ठाम विश्वास योगिता नाईक यांनी स्पष्ट केला आहे.

3/5 - (2 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे