मुंबई पोलिस क्राईम ब्रँच ने बदलापूरमधील यशोदा ऑरगॅनिक फूड प्रा. लि. आणि भिवंडीतील दिशा डेअरी या दोन कारखान्यांवर टाकलेल्या छाप्यात २१३१ किलो बनावट पनीर जप्त…
अमित जाधव-संपादक
हॉटेल मध्ये पनीर खाताय? सावधान !!!
मुंबई पोलिस क्राईम ब्रँच ने बदलापूरमधील यशोदा ऑरगॅनिक फूड प्रा. लि. आणि भिवंडीतील दिशा डेअरी या दोन कारखान्यांवर टाकलेल्या छाप्यात २१३१ किलो बनावट पनीर जप्त केले..
सगळ्यात गंभीर बाब म्हणजे बदलापूर पासून ते कल्याण , ठाणे , नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईतील अनेक ढाबे, रेस्टॉरंट्स आणि भोजनालयांना वर्षभरापासून हे बनावट पनीर पुरवलं जात होतं.. मुंबई पोलिसांनी ६ मे रोजी चेंबूरमध्ये एक टेम्पो ताब्यात घेतला आणि ६३१ किलो बनावट पनीर जप्त केलं होतं. त्यांनी पनीरचे नमुने घेतले त्या टेम्पोमधून ते चेंबूर येथील एका डेअरीत नेले जाणार होते.
जप्त केलेले नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडे (FDA ) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्या अहवालात ते बनावट होते, त्यात तेल होते आणि ते खाण्यायोग्य नव्हते, अशी माहिती समोर आली.’ या अहवालानंतर, FDA अधिकाऱ्याने बुधवारी चेंबूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) २७२ (विक्रीसाठी अन्न किंवा पेयामध्ये भेसळ) आणि २७३ (हानीकारक अन्न किंवा पेय विक्री) या अंतर्गत एफआयआर दाखल केला. यानंतर क्राइम ब्रँच कंट्रोल युनिटने यासंबंधी तपास हाती घेतला.
या प्रकरणी या कंपनीच्या मालकासह एकूण सात आरोपींना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
या दोन्ही कारखान्यांमधून पामतेल, दूध पावडर आणि पनीरने भरलेले ९५ कंटेनर जप्त करण्यात आले आहे.’ दरम्यान, हे नकली पनीर २००-२५० रुपयांना विकले जात होते. ते तयार करण्यासाठी दुधाऐवजी दुधाची पावडर आणि पाम तेल वापरत होते. यामध्ये एका कारखान्यात दररोज सुमारे २००० किलो पनीर विकले जात होते. त्यामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता.