Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील वीर हनुमान गोविंदा पथकाने पहिल्याच वर्षात मुंबई व ठाणे जिल्ह्यात 6 व 7 थर रचत फोडल्या मानाच्या हंड्या….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

♦दिव्यातील वीर हनुमान गोविंदा पथकाने पहिल्याच वर्षात मुंबई व ठाणे जिल्ह्यात 6 व 7 थर रचत फोडल्या मानाच्या हंड्या….

दहीहंडी निमित्त दिव्यातील वीर हनुमान गोविंदा पथकाने प्रथमच वर्षी मा.उपमहापौर रमाकांत मढवी जी यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा दातीवली चे शाखाप्रमुख व मंडळाचे आधारस्तंभ निलेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली वीर हनुमान गोविंदा पथकाने मुबई व ठाणे येथे मानाच्या हंड्याना 6 व 7 थरांची सलामी देत उत्कृष्ट रित्या मानवी मनोरे रचले मुंबई व ठाण्यातील अनेक शहरांमध्ये 150 ते 200 गोविंदासह वीर हनुमान गोविंदा पथकाने थर रचत विशेष पारितोषिके मिळविले.
यावेळी मंडळाचे निलेश म्हात्रे यांनी बोलताना स्पष्ट केले की मंडळाने मुलांची विशेष काळजी घेत कोणताही गोविंदा जखमी होऊ नये म्हणून मंडळाचे कार्यकर्ते यांनी देखील अथक परिश्रम घेऊन आपली भूमिका पार पडली.पथकातील सर्वात वरच्या थरावर असणाऱ्या गोविंदाला विशेष सुरक्षा कवच म्हणून हेल्मेट व सेफ्टी जॅकेट देण्यात आले होते असे निलेश म्हात्रे यांनी सांगितले व तरुणांनी कोणतेही गालबोट न लागता सुरक्षितपणे सणाचा आनंद घ्या असे आवाहन करुन ठाणे जिल्ह्यातील कब्बद्दी प्रो सारख्या स्पर्धांमधे दिव्याचे खेळाडू गेले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. शिंदे – फडणविस सरकारने गोविंदासाठी चांगला निर्णय घेतला असून दहा लाखाचे विमा कवच देण्याची घोषणा केली असल्याचे ही निलेश म्हात्रे यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे