
पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार
राज्याच्या गृहखात्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार गृह विभागाने दिला आहे. यासंदर्भात गृह विभागाकडून राजपत्र जारी करण्यात आले. त्यासाठी काही अटही घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार, पोलिस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा, त्यांनी 7 वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी. याआधी केवळ पोलीस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अधिकार होता