Breaking
ब्रेकिंग

दिव्यात साबे गाव येथे शिवशक्ती डेअरी या दुकानाला रात्रीच्या सुमारास लागली आग…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिनांक ०८/१०/२०२४ रोजी ०१:४१ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  दिवा हायस्कूल जवळ, साबेगाव रोड, दिवा, ठाणे या ठिकाणी मे. शिवशक्ती डेअरी या दुकान गाळ्यामध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी पोलीस कर्मचारी, टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, ०१- रेस्क्यू वाहनासह, ०१- वॉटर टँकर वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.आग लागलेल्या मे. शिवशक्ती डेअरी या दुकान गाळ्यामध्ये दोन मोठे फ्रिज एक लहान फ्रिज तसेच इतर साहित्य होते सदर दुकान गाळा पूर्णतः जळाल्याने नुकसान झाले आहे.

सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून ०२:५३ वाजताच्या सुमारास विझविण्यात आली असून, ०३.४१ वाजताच्या सुमारास कुलिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे