0
2
0
9
7
4
चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा
मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील संतोषनगरमध्ये चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या सर्व जणांना एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामधील 9 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तर स्वप्निल डहाणूकर, मुस्ताक अहमद आणि सुजित जयस्वाल या तिघांची प्रकृती अस्थिर आहे, असे सांगण्यात येत आहे.
0
2
0
9
7
4



