बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा शहरातील अर्धवट राहिलेल्या रस्ते, गटार व इतर अपुऱ्या सुविधा लवकरात लवकर कराव्यात पूर्ण, दिवा भाजप महीला मोर्चा अध्यक्षा च्या सपना रोशन भगत आक्रमक…

अमित जाधव - संपादक

दिवा शहरातील अर्धवट कामे लवकरात लवकर पूर्ण करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी  भाजप च्या महीला मोर्चा अध्यक्षा सौ सपना रोशन भगत यांनी आक्रमक होत दिवा प्रभग समितीतर्फे आयुक्तांना धारेवर धरत जाब विचारला.
शहरातील प्रमुख गटारे पूर्णपणे साफ करण्यात यावे व गटारामध्ये सांडपाणी जाण्याकरता टाकलेल्या पाईपाना जाळी बसवण्यात यावे , तसेच दिव्यात विविध भागांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्यामुळे नागरिकांना अनेक साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे.यामुळे रोगराई सुद्धा पसरत आहे  अशी परिस्थिती अनेक भागांमध्ये आहे, म्हणून या कचऱ्यांचा विल्हेवाट योग्य रीतीने मार्गी लावाव्यात या साठी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडघे यांना भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ सपना रोशन भगत यांनी प्रत्यक्षपणे भेटून दिव्यातील विविध भागातील प्रश्न सुद्धा मांडण्यात आले. यावेळी दिवा मंडळाचे अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य रोशन भगत, व्यापारी सेलचे अध्यक्ष जयदीप भोईर, ठाणे महिला मोर्चा सदस्य पूनम तिवारी,  सुरज पानसरे, अजित सातपुते, अंकित गुप्ता इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे