Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दहावीत अनुउतीर्ण विद्यार्थ्यांना महत्वाचा सल्ला,सैराट चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे दहावीत दोन वेळा नापास,

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

सैराट, फॅण्ड्री अशा गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांची कहाणी प्रत्येक तरुणांना प्रेरणा देणारी आहे. नागराज मंजुळे हे दहावी परीक्षेत दोनवेळा नापास झाले होते. त्यांच्या मार्कशीटवर (Nagraj Manjule SSC Marksheet) मोठ्या अक्षरात FAIL असे लिहिले आहे. दरम्यान नागराज यांनी स्वत:ची दहावी उत्तीर्ण झाल्याची मार्कशीट २०१५ साली सोशल मीडियात शेअर केली होती. त्यानुसार त्या दहावीच्या परीक्षेत त्यांना ३८.२८ टक्के गुण म्हणजेच ७०० पैकी २६८ गुण मिळाले आहेत.२०१८ मध्ये जेव्हा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल येणार होता तेव्हा त्यांनी तो निकाल पुन्हा शेअर केला. हे शेअर करत त्यांनी ज्या विद्यार्थ्यांचा निकाल चांगला नाही किंवा जे अनुत्तीर्ण झाले त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला.मी दहावीत दोनदा नापास झालो. अपयशामुळे सर्व काही संपते असे नाही. पहिल्याच प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो, पण तसं झालं नाही.
कोणतेही, कितीही मोठे संकट येऊ दे; पण खचून जाऊ नका. मी दहावीत नापास झालो होतो. आज मी काय आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे असे नागराज विद्यार्थ्यांना सांगतात. प्रत्येकाने आपल्या अंगी असलेल्या धाडसाला जागृत ठेवणे जास्त गरजेचे आहे. आयुष्य खूप मोठं आहे. त्याचे वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी सदैव तयार राहीले पाहीजे. त्यानंतर मार्ग आपोआप मिळत राहतो आणि यशही आपली साथ देते.पास झालो म्हणजे खूप मोठा तीर मारला असं नसतं आणि नापास झालो म्हणजे आपल्यात काही खोट आहे, असंही नसतं. आनंदानं जगता येणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्याचा पास-नापास याच्याशी संबंध नसतो असे देखील नागराज यांनी सांगितले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे