
पुण्यातील बावधन येथे हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट आणि एका अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जात होते, अशी माहिती आहे. सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. तटकरे आज पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यापूर्वीच अपघात घडला.