बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर साहेबांना दिवा शहरातील रस्ते व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाहणी दौरा करण्याचे दिले आमंत्रण…अमोल केंद्रे

अमित जाधव - संपादक

ठाणे महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर साहेबांनी धाडसी निर्णय घेऊन दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्यावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी निलंबनाची कारवाई केली. दिवा प्रभाग समिती अंतर्गत 90 पेक्षा जास्त इमारतीचे अनधिकृत बांधकामे ठाणे महानगर पालिका अधिकारी कर्मचारी तसेच राजकीय नेते,यांच्या संगनमताने सुरू आहेत.मग त्यांच्यावर ही कार्यवाही व्हायला हवी.फक्त फारुख शेख यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करणे हा अन्याय आहे.इतर अधिकारी, राजकीय दबाव आणणारे राजकारणी,बिल्डर सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही कार्यवाही करावी.असे समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन दिले. ज्या प्रमाणे धाडशी निर्णय घेवून फारुख शेख यांचे निलंबन केले.त्याप्रमाणे दिवा शहरातील जनतेचे प्रश्न समस्या सोडून आपण न्याय द्यावा.दिवा शहरातील नागरिकांना सार्वजनिक शौचालय, पोलीस स्टेशन साठी जागा, ग्रंथालय, वाचनालय, सहकारी हॉस्पिटल,सांस्कृतिक भवन, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, खेळाचे मैदान,गार्डन, चांगले रस्ते फेरीवाल्या बांधवांच्यासाठी फेरीवाला झोन,मार्केट या सर्व सुविधा देवून.अनधिकृत बांधकामांचे शहर,पाणी नसलेले शहर, दिव्या खाली अंधार असलेले शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या शहरात आपण विकासाची ज्योत पेटून अंधार मय असलेल्या दिवा शहरात विकासाचा प्रकाश पाडून दिवा शहरातील नागरिकांना न्याय द्यावा.दिवा शहरातील मुंब्रा देवी कॉलनी दिवा स्टेशन रस्ता, मुंब्रा देवी कॉलनी ट्रान्सफॉर्मर रस्ता,ओमकार नगर,वक्रतुंड नगर रस्ता,सावरिया डेअरी बेडेकर नगर, रविना अपार्टमेंट बेडेकर नगर रस्ता, दिवा स्टेशन गावदेवी मंदिर एन आर नगर रस्ता, एंजल पॅराडाईज शाळा नारायण भगत नगर रस्ता,दत्त मंदिर मागील मुंब्रा देवी कॉलनी रस्ता, वारेकर शाळा दत्त मंदिर रस्ता,जीवदानी नगर साबे गाव रस्ता तात्काळ बनवण्यासाठी,पाणी प्रश्न सोडवण्यासाठी व इतर सुविधा देवून सहकार्य करण्यासाठी आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी दौरा करून दिवा शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून सोडवण्यात याव्यात. असे दिवा शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी निवेदन देवून पाहणी दौरा करण्याचे जाहीर निमंत्रण दिले.

समाजसेवक अमोल धनराज केंद्रे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे