आज पासून आर टी ई चे मोफत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचे सुरू,६२९ शाळा पात्र,लिंक व सविस्तर बातमी मध्ये पहा….
अमित जाधव - संपादक
*RTE २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश २०२३-२४
दि. १ मार्च २०२३, जिल्हा परिषद ठाणे
ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना कळविण्यात येते कि सन २०२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण 629 पात्र शाळा असून एकूण १२२७८ रिक्त जागा उपलब्ध आहेत . RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या वेबसाईट वर दिनांक ०१/०३/२०२३ दुपारी ३.०० ते १७/०३/२०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑन लाईनप्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जांची नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक ), जिल्हा परिषद ठाणे कडून करण्यात येत आहे.