चोरवणे गाव”१००% निकालाची “शारदा विहार माध्यमिक विद्यालयाची” परंपरा कायम….
अमित जाधव-संपादक
“चोरवणे गाव”१००% निकालाची “शारदा विहार माध्यमिक विद्यालयाची” परंपरा कायम
चारी साईटने उंच-उंच सह्याद्रीच्या पर्वत रांगा, घनदाट जंगल ,”अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती” *छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला वासोटा किल्ला* पर्वत शिखरावर विराजमान श्री स्वयंभू नागेश्वर मंदिर* त्याच्या पलीकडे अथांग कोयना धरण स्वच्छ निळसर कोयनेचे पाणी जणू *कोकणातील स्वर्ग* अशा या सुंदर चोरवणे गावामध्ये शारदा विहार माध्यमिक विद्यालयाचे रोपटे लावण्यात आल होत. “इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी”
गेले कित्येक वर्ष 100% रिझल्ट हे विद्यालय देत आहे येथील सर्वच शिक्षक वर्ग अतिशय परिश्रम करून सर्वस्वाच दान करून येथील विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम असं शिक्षण देत आहेत *”गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा”
आज खेड्यापाड्यांमध्ये अनेक शाळा बंद होत चालले आहेत नव्हे बंद झाल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये चोरवणे गावातील शिक्षण प्रेमीनी, ग्रामस्थांनी, तरुणांनी अतिश दैदिप्यमान निर्णय घेऊन *सैनिकी पॅटर्न वस्तीगृहाची* निर्मिती केली आणि आज बघता बघता याच सैनिकी पॅटर्न वस्तीग्रह मध्ये शारदा विहार माध्यमिक विद्यालय मध्ये शंभरच्यावर विद्यार्थी सैनिकी प्रशिक्षण घेत आहेत तेही अतिशय कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त प्रगती ,उन्नती या हेतूने आज निसर्गरम्य विद्यालय बघता बघता अक्षरशः शिक्षणाचं नंदनवन होऊन गेलेला आह शिक्षणाची गंगा या चोरवणे गावामध्ये आज भरभरून वाहत आहे अनेक विद्यार्थी आपले भविष्य घडविण्यासाठी येथे सैनिकी पॅटर्न वस्तीग्रह मध्ये येऊन शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेत आहेत आपलं भविष्य, आपला वर्तमान उज्वल करत आहेत खेड्यापाड्यातून मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या पालक-विद्यार्थी आज
O
मुंबईवरून या गावांमध्ये आपल्या पाल्याला घेऊन जात आहेत त्याच भविष्य सर्वतोपरी उज्वल करत आहेत या आपण देखील ह्या शारदा विहार माध्यमिक विद्यालयाला, ह्या चोरवणे गावाला एकदा तरी अवश्य भेट द्या धन्यवाद