0
2
0
9
7
8
- गुजरातहून मुंबईला येणारी रेल्वे रूळावरून घसरली
गुजरात राज्यातून मुंबईच्या दिशेने येणारी एक रेल्वे रुळावरून घसरली आहे. ही रेल्वे मालवाहतूक करणारी होती. पालघर रेल्वेस्थानक परिसरात ही मालवाहू रेल्वेगाडी घसरल्याने याचा परिणाम लोकलवरही झाल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. लवकरात लवकर रेल्वेचे डब्बे उचलण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
0
2
0
9
7
8



